मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

रविवार, 24 जानेवारी 2021 (13:30 IST)
दररोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे आणि घरात ब्रेड आणि रवा सगळेच आहे मग आपण ह्याचा वापर करून चविष्ट उत्तपा करू शकता. ब्रेड चे सँडविच तर नेहमीच खातो. पण जेव्हा दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांची गोष्ट करावी तर हे आरोग्यासाठी चांगले तर असतंच आणि लोकांना देखील आवडते. आज ज्या रेसिपी बद्दल बोलत आहोत ती बनवायला सोपी आहे आणि मुलांना आवडणारी देखील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
 
4 ब्रेडचे स्लाइस, 1/2 कप रवा, 2 मोठे चमचे मैदा, 1/2 कप दही, 1 मोठा चमचा आलं किसलेलं, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 ढोबळी मिरची बारीक चिरलेली ,1 टोमॅटो बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीपुरती, तेल आवश्यकतेनुसार, पाणी आवश्यकतेनुसार. 
 
कृती -   
सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे कडे कापून घ्या आणि पांढऱ्या भागावर पाणी लावून त्यांना मऊसर करा.हे स्लाइस रवा,तेल आणि दह्यासह मिसळून पेस्ट बनवून घ्या लक्षात ठेवा की पेस्ट अशी बनवायची आहे की सहजपणे तव्यावर पसरेल. या पेस्ट मध्ये भाज्या ढोबळी मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा घालून मिश्रण मिक्स करा.  आता या मिश्रणात शेवटून मीठ घाला जेणे करून मिश्रणाला पाणी सुटणार नाही. 
तवा गरम करण्यासाठी  ठेवा.आता तव्यावर तेल घाला आणि गरम झाल्यावर उत्तप्याचा घोळ घालून पसरवून द्या. एकी कडून शेकून झाल्यावर पालटून द्या आणि थोडंसं तेल सोडा. दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम उत्तपे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती