साहित्य-
4 मोठे कांदे,4 टोमॅटो,25 ग्रॅम आलं, 25 ग्रॅम लसूण, कोरडी लाल मिरची,1 चमचा हळद,2 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरे पूड 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, गरजेपुरते तेल.
साहित्य -
कांदा,लसूण टोमॅटो, आलं ह्यांचे मोठे तुकडे कापा.आता पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये लाल मिरची, आलं, लसूण परतून घ्या.
नंतर कांदा टोमॅटो टाकून परतून घ्या. थंड करून ह्याचे वाटण करा. या पेस्ट ला जास्त तेलात परतून घ्या. या मध्ये सर्व कोरडे मसाले घाला गरम मसाला,धणेपूड,जिरेपूड,हळद, तिखट. या वाटण ला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आपला इन्स्टंट ग्रेव्ही भाजीचा मसाला तयार. कोणत्याही भाजी सह वापरा.