झणझणीत पापडाची चविष्ट भाजी

शनिवार, 16 जानेवारी 2021 (19:10 IST)
दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण प्रत्येक गृहिणींसाठी हा मोठा प्रश्न असतो की त्यांनी जेवायला भाजी काय बनवावी.तर या साठी आम्ही पापडाची भाजी ची नवीन रेसिपी सांगत आहोत. ह्याची चव देखील खूप चांगली आहे की आपल्याला नक्कीच आवडेल .चला तर मग साहित्य आणि कृती  जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
4 पापड,1/2 कप दही,2 टोमॅटोची प्युरी, 2 हिरव्या मिरच्या,आलं,3 मोठे चमचे तेल,कोथिंबीर, कसुरी  मेथी ,1 /2 लहान चमचा हिंग,1/4 चमचा हळद,1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा तिखट. 1/2 चमचा जिरे,मीठ चवी प्रमाणे.
 
कृती- 
पापड भाजून किंवा तळून घ्या .दह्यात अर्धा कप पाणी मिसळून फेणून घ्या. भाजी बनविण्यासाठी कढईत तेल गरम करून या मध्ये जिरं, हिंग, हळद, तिखट,धणेपूड,कसुरी मेथी, टोमॅटो पेस्ट किंवा प्युरी आलं,आणि हिरव्या मिरच्या घालून रंग बदल पर्यंत परतून  घ्या.लाल तिखट आणि एक कप पाणी घालून झाकण ठेवून उकळी घ्या.      
कढईत मसाला कडे वरून तेल सोडू लागल्यावर या मध्ये दही घालून शिजवून घ्या. शिजल्यावर मीठ घालून पापडाचे लहान तुकडे करून मिसळा .मंद आचेवर काही वेळ भाजी उकळवा नंतर गॅस बंद करा .वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरम भाजी, पोळी सह सर्व्ह करा.   
.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती