कृती-
सर्वात आधी पोहे स्वच्छ चाळुन कोरड्या कढईमध्ये मंद आचेवर खमंग भाजून घ्या. आता थंड होऊ द्या. कढईत तेल गरम करून शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, काजू आणि चणे डाळ मंद आचेवर तळून कुरकुरीत करा. बाजूला काढून ठेवा. आता त्याच तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करा. हळद घालून मंद आचेवर मिक्स करा. नंतर भाजलेले पोहे, शेंगदाणे, खोबरे, काजू आणि डाळ घाला. मीठ आणि साखर घालून सर्व काही चांगले मिक्स करा. दोन मिनिटे परतून गॅस बंद करा. थंड झाल्यावर लिंबू पावडर घालावी व चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तर चला तयार आहे आपला पोह्यांचा चिवडा पाककृती.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.