कॉर्न कटलेट बनवण्यासाठी मिक्सरमधून स्वीटकॉर्न जाडबारीक अश्या पद्धतीने दळून घ्या. यामध्ये गाजर, सिमला मिरची, कांदा, कोथिंबीर घाला. मग यामध्ये हळद, तिखट, धणे पूड, जिरे पूड, मीठ घाला. आता यामध्ये उकडलेले बटाटे आणि किसलेले चीज चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ब्रेड क्रम्ब्स वर मक्याचे पीठ घालावे. व नरम गोळा बनवावा. हातांना तेल लावून गोल आकार द्यावा. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये फ्राय करावे. तर चला तयार आहे आपले चीज कॉर्न कटलेट, सॉस सोबत गरम सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.