सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. भेंडी उभ्या आकारांमध्ये कापावी, आता कढईमध्ये तेल गरम करावे. यामध्ये भेंडी मीठ आणि हळद टाकून शेकून घ्यावी. मग परत तेल गरम करून जिरे घालावे. आता मध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. आता दहीमध्ये सर्व मसाले घालावे. तसेच कांदा घालावा. मग यामध्ये भेंडी घालावी. यावर मग थोडे मीठ, कोथिंबीर, गरम मसाला घालावा. चला तर तयार आहे आपली तडका दही भेंडी भाजी. पराठे किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.