सध्या उन्हाळा सुरु आहे. मुलांना देखील सुट्टी लागली आहे. संध्याकाळी प्रत्येकाला छोटी छोटी भूक लागते. अश्यावेळेस काय करावे सुचत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट बनेल असा ब्रेड पुलाव, तर चला लिहून घ्या रेसिपी
कृती-
ब्रेड पुलाव बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करावे तसेच त्यामध्ये मोहरी घालावी. मग हिर्वी मिरची, कांदा, मीठ, हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला टाकून दोन मिनिट शिजवावे. मग मध्ये टोमॅटो, शिंमला मिर्ची घालावी. मग परत दोन मिनिट शिजल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेल्या ब्रेडच्या स्लाइस घालाव्या. व त्यावर केचप टाकावे. दोन मिनिट शिजवल्यावर यावर भाजलेले शेंगदाणे घालावे. तर चला तयार आहे आपला गरमागरम, झटपट ब्रेड पुलाव.