बाजारासारखा पनीर रोल आता घरी, जाणून घ्या रेसिपी

शुक्रवार, 31 मे 2024 (07:00 IST)
मार्केटमध्ये पनीर रोल लागलीच मिळतो जो खाण्यासाठी चविष्ट असतो. पण तुम्ही याला घरी देखील बनवू शकतात. तसेच लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतात. तर चला जाणून घेऊ या पनीर रोल रेसिपी 
 
साहित्य 
पाणी 
कांदा 
हिरवी मिर्ची 
टोमॅटो 
शिमला मिर्ची 
मैदा 
पनीर 
सोडा 
तिखट 
हळद 
दूध 
कोथिंबीर 
कॉर्नफ्लॉवर 
लोणी 
गरममसाला 
आले पेस्ट 
तेल 
गव्हाचे पीठ 
चवीनुसार मीठ 
 
कृती 
पनीर रोल बनवण्यासाठी सर्वात आधी पोळी बनवावी. पोळी बनवण्यासाठी परातमध्ये गव्हाचे पीठ घ्यावे. पिठामध्ये मीठ, तेल, दूध, पाणी टाकावे. आता पीठ मळून गोळा तयार करावा. आता बाऊलमध्ये मैदा, कॉर्न फ्लॉवर, लोणी, सोडा, पाणी मिसळावे. सर्व वस्तूंना चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये कांडा टाकून फ्राय करावा. मग टोमॅटो टाकावा. कढईमध्ये हळद, गरम मसाला, तिखट, कोथिंबीर, शिमला मिर्ची, मीठ आले पेस्ट, पनीर घालावे. मळलेल्या पिठाच्या बारीक बारीक पोळ्या कराव्या. त्यांना शेकून घ्यावा. पोळी शेकल्यानंतर त्यावर पनीरची पेस्ट टाकावी. आता पोळीला फोल्ड करावे. अश्याप्रकारे तुम्ही घरीच बाजार सारखा पनीर रोल बनवू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती