हलकं खाण्याची इच्छा असल्यास बनवा कॉर्न पुलाव

मंगळवार, 2 मार्च 2021 (18:47 IST)
कधी कधी काही हलकं खावंसं वाटते या साठी विचार करतो की काय बनवावं. तर आपण पुलाव बनवू शकता. चवीला चांगले असण्यासह पचायला देखील सोपे आहे चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य - 3/4 कप मक्याचे दाणे, दीड कप तांदूळ धुऊन भिजत घातलेले, 1 चमचा तेल, 5-6 काळेमिरे  ,4−5 लवंगा, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कांदा बारीक चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, हळद,हिरव्या मिरच्या.    
 
कृती -
सर्वप्रथम एका कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल घालून गरम करा या मध्ये लवंगा, काळीमिरी, दालचिनी, वेलची, आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. या मध्ये कांदा,हिरवी मिरची,हळद घालून कांदा सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या नंतर धुतलेले तांदूळ घाला.पाणी आणि कॉर्न घालून मीठ घाला आणि झाकण लावून मंद आचेवर दोन शिटी घेऊन गॅस बंद करा. कॉर्न पुलाव तयार. दही किंवा रायत्यासह सर्व्ह करा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती