उष्णता कमी करणारा आरोग्यवर्धक चविष्ट दही -भात

शनिवार, 1 मे 2021 (17:57 IST)
उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी दही भात खाणे सर्वोत्तम आहे. हे बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. हे चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहे.चला तर साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
1 कप तांदूळ, 10-12 पाने कडी पत्ता, 1/2 चमचा मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप दही, चिमूटभर हिंग, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. सेंधव मीठ चवीप्रमाणे,फोडणीसाठी तेल.
 
कृती-     
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या. एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात कडीपत्ता मोहरी, हिंग,घालून फोडणी तयार करा. आता शिजवलेल्या भातात दही,मीठ  आणि कोथिंबीर मिसळून वरून ही फोडणी ओतून द्या.आपला आरोग्यवर्धक चविष्ट दही भात तयार .आपण या मध्ये आपल्या इच्छेनुसार कांदा,टोमॅटो,चाट मसाला देखील घालू शकता.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती