Garlic Pickle Recipe: चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे

गुरूवार, 4 जुलै 2024 (07:03 IST)
लसणाचे लोणचे फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लोणचे जेवणातील चव वाढवत असते. तसे पाहिला गेले तर लोणचे जेवणातील चव वाढवत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत एका आरोग्यादायी लोणच्याबद्दल. ज्याच्या सेवनाने आरोग्य चांगले राहते. लसूणमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात.जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
 
साहित्य-
250 ग्राम लसूण 
एक चमचा मेथी दाणे
एक चमचे मोहरी
एक चमचा तिखट 
एक चमचा बडीशेप 
तीन ते चार चिमूट हींग
अर्धा चमचा लिंबाचा रस
अर्धा चमचा हळद
250 ग्रॅम तेल 
चवीनुसार मीठ 
 
कृती-
लसणाचे लोणचे बनवण्यासाठी लसूण पाण्यात भिजवून ठेवा. तसेच साल काढून थोडावेळ पार्ट पाण्यामध्ये भिजत ठेवावे. आता बडीशेप, मोहरी आणि मेथी दाणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर लसूण पाकळ्या घालाव्या. मग यामध्ये तिखट, हळद, हिंग घालावे.
 
हे चांगल्याप्रकारे मिक्स केल्यानंतर, बारीक केलेले मिश्रण घालावे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. मग याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्या. शिजल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा. या सर्व वस्तू मिक्स केल्यानंतर थंड होऊ द्यावे व काचेच्या बरणीमध्ये भरावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती