विदर्भ नगरीचे दैवत श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने, भक्तभावाने साजरा केला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणारी श्री गजानन गुरुमाऊली यांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असते. आज आपण श्री गजानन बाबांना आवडणारे काही पदार्थ व त्यांची रेसिपी पाहणार आहोत. जे पदार्थ महाराजांना अतिशय प्रिय होते. जसे की, झुणका, ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठलं, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर, चहा वगैरे इत्यादी पदार्थ आवडायचे महाराजांना प्रिय होते. श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिन दिवशी नक्कीच तुम्ही या पदार्थांचा नैवद्य दाखवू शकतात.
झुणका- सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. आता त्यात जिरे आणि हिंग घालावा. तसेच आता आले पेस्ट, हिरवी मिरची तुकडे, लसूण तुकडे आणि बारीक चिरलेले कांदे घालावे व आता मध्यम आचेवर पाच मिनिट परतवून घ्यावे. नंतर हळद, बेसन आणि मीठ घालून ढवळून घ्यावे व शिजवावे. तसेच दीड कप गरम पाणी घालून एकदा हलवून आता झाकण ठेवावे. साधारण तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजवावे. जेणेकरून त्यातील पाणी आटेल. व झुणका छान मोकळा असा होईल. आता कोथिंबीर गार्निश करावी. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता, तिखट घालावे व झुणक्याला छान अशी फोडणी द्यावी.
ज्वारीची भाकरी-सर्वात आधी ताजे ज्वारीचे पीठ घ्यावे. आता त्यात चवीपुरता मीठ घालून मिक्स करावे. आता कोमट पाणी पिठामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात घालावे व मऊ असा गोळा तयार करावा. आता परातीत किंवा पोळपाटावर म्हणजे तुम्हाला सोपे जाईल अशी भाकरी थापून घ्यावी. आता तयार भाकरी तवा गरम करून तव्यावर टाकावी व वरून थोडेसे पाणी फिरवावे, पाणी संपूर्ण भाकरीवर फिरावे. आता काही वेळा नंतर भाकरी पलटवावी. अश्याप्रकारे दोन्ही बाजूंनी भाकरी शेकून घ्यावी. आता तयार भाकरीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा पसरवावा. तर चला तयार आहे आपली ज्वारीची भाकरी रेसिपी.
अंबाडीची भाजी- सर्वात आधी चणा डाळ, दाणे भिजत टाकून घ्यावे. आता कुकरला चिरलेली अंबाड्याची भाजी, दाणे, डाळ उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. आता तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. नंतर मीठ, मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी. वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली अंबाडीची भाजी रेसिपी.
पिठलं-सर्वात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून घ्यावे. घट्ट करून नये. साधारण पातळ मिश्रण करावे. आता एक कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जिरे घालावे. आता आले लसूण पेस्ट व हिंग घालावे. आता कढीपत्ता व मिरचीचे तुकडे घालावे. आता नंतर हळद, तिखट, धणेपूड घालावी यानंतर तयार बॅटर घालावे व ढवळून घ्यावे. व झाकण ठेवावे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो देखील घालू शकतात. आता तयार पिठल्यावर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट असे पिठलं.
साधा सोपा झणझणीत ठेचा-सर्वात आधी तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्या धुवून घ्याव्या. आता एका कढईमध्ये एक टीस्पून तेल घालून मिरच्या चांगल्या प्रकारे परतवून घ्या. आता या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून वरून मीठ, जिरे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालावी व मिक्सरमधून जाड बारीक असे करावे. आता तयार असा ठेचा एका वाटीमध्ये काढून त्यावर तेल सोडावे, तर चाल तयार आहे आपला साधा आणि सोप्पा असा झणझणीत ठेचा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.