कचोरी खुसखुशीत बनवण्याच्या सोप्या टिप्स

गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (19:00 IST)
बरेच जण घरीच कचोरी बनवतात. तसेच चहा सोबत कचोरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.साधारणपणे घरी बनवलेली कचोरी ही बाजारात मिळणाऱ्या कचोरी प्रमाणे खुसखुशीत नसते. तर तुम्ही देखील बाजारात मिळणाऱ्या खुसखुशीत कचोरी सारखी कचोरी घरी बनवू शकाल. चला तर जाणून घ्या. खुसखुशीत कचोरी बनवण्याच्या काही सोप्या टिप्स 
 
खुसखुशीत कचोरी बनवण्याच्या काही टिप्स- 
गव्हाच्या पीठापासून बनवलेली कचोरी ही जास्त दिवस टिकत नाही. तिला बनवल्यावर लगेच खावे लागते. पण मैद्याच्या कचोरीचे तसे नसते. मैदापासून बनलेली कचोरी ही 10 ते 12 दिवस टिकते . 
 
साहित्य-
2 कप मैदा 
10 ते 12 चमचे तेल 
चिमुटभर बेकिंग सोडा 
आवश्यकतेनुसार पाणी 
 
कृती- 
एका परातीत मैदा घेऊन त्यात थोड़े तेल टाकावे आता यात चिमुटभर बेकिंग सोडा घालून पाणी मिक्स करा. लक्षात ठेवा की मोहन जेवढे चांगले घालाल . कचोरी तेवढीच खुसखुशीत बनेल. मैद्यात मोहन घातल्यावर जर त्या मिश्रणाचे थोडेसे लाडूच्या आकाराचे गोळे तयार होत असतील तर समजून जा की मोहन चांगले घातले गेले आहे. ते मळतांना पीठ थोडे घट्ट असावे. या गोष्टीचे लक्ष्य ठेवावे. अनेक महिला कचोरीच्या पिठाला नेहमी ओल्या कपडयाने झाकून ठेवतात. ते पीठ 10 मिनित झाकावे.  पण ओल्या कपडयाने नाही तर एखाद्या प्लेट ने झाकून ठेवावे. तसेच कचोरी बनवतांना त्याचे कडे  थोडे बारीक ठेवावे. व मधला भाग थोडा जाडसर ठेवावा. तसेच कचोरी ही मध्यम गॅस वर तळावी  कमी व जास्त गॅस वर बनवल्यास त्या खुसखुशीत बनत नाही.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती