पनीराचे धिरडे

गुरूवार, 25 ऑगस्ट 2011 (13:12 IST)
ND
साहित्य : 1 कप बेसन, 2 चमचे कॉर्नफ्लोर किंवा तांदुळाचे पीठ, 1 चमचा आलं, लसूण, मिरचीचे पेस्ट, 1/2 कप किसलेले पनीर, मीठ, तिखट, हळद, धणेपूड चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम बेसमध्ये सर्व मसाले घालून घोळ तयार करावा. आलं, लसूण, मिरचीचे पेस्ट, किसलेले पनीर आणि कॉर्नफ्लोरपण त्यात घालून मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावे. आता तव्यावर तेल घालून मध्यम आचेवर धिरडे तयार करून सोनेरी होईपर्यंत शेकावे. गरमा-गरम पनीर धिरडे तयार आहे. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा