ग्रीन आलू

मंगळवार, 3 फेब्रुवारी 2015 (17:52 IST)
साहित्य : छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे, एक वाटी पुदिना पाने, एक-दोन वाटी कोथिंबीर, एक छोटा चमचा आले लसून पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, दोन डाव तेल, मीठ, हळद. 
 
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून साल काढून बटाट्याला काट्याने टोचा मारून घ्याव्यात.  पुदिना, कोथिंबीर, मिरची बारीक वाटून त्यात मीठ, आले लसून पेस्ट मिसळावी. हे मिश्रण बटाट्याला चोळून दोन तास ठेवावे. नंतर दोन डाव तेलाची फोडणी करून त्यात बटाटे घालून झाकण न ठेवता दहा मिनिटे परतावेत. 

वेबदुनिया वर वाचा