भरावी खड्डा भरून माती उरल्यास ती भूमी चांगली जाणावी.
पद्धत क्र. २- वरील प्रमाणे खड्डा करून त्यात पूर्ण पाणी भरणे व खड्ड्यापासून १०० पाऊले चालत जाऊन परत येणे. या वेळात शिल्लक पाणी ३/४ कमी
पद्धत क्र. ३- वरील प्रमाणे सूर्यास्तास खड्डा पाण्याने पूर्ण भरणे आणि सूर्यादयाला परिक्षण करणे. जर पणी निम्म्यापेक्ष जास्त शिल्लक असेल तर जमिन उत्तम. जर पाणी आटून पूर्ण तळाला भेगा पडाल्या असतील, तर ती भूमी अत्यंत वाईट जाणावी.
प्लॉटची जमीन : ज्या जमिनीवर वनस्पती झाडे उगवतात. ती जमिन सजीव भूमी समजली जाते. अशी जमिन वास्तुसाठी शुभ असते. ज्या जमिनीत वनस्पती, हिरवे गवत उगवत नाही, जिथे किंचीत ओलावा नाही, जी जमिन खारी आहे, ज्या जमिनीत काटेरी वनस्पती उगवतात किंवा जी जमिन खडताळ, रेताड असेल अशा भूमिला मृत भूमी समजतात. अशी भूमी वास्तू निवासासाठी अयोग्य असते. या जागेत रहिवाश्याची प्रगती होणे अशक्य असते. त्याचप्रमाणे मन स्वास्थ्य लाभत नाही.