जेवताना पाण्याचा पेला कोणत्या बाजूला ठेवावा?

मंगळवार, 19 एप्रिल 2022 (16:08 IST)
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जेवताना दिशेची काळजी घेतली जाते. उदाहरणार्थ दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. अशाप्रकारे जेवणाचे ताट दिल्यावर पोळी-पाणीचे स्थान देखील महत्त्वाचे असतं.. जाणून घेऊया जेवताना पाण्याचा ग्लास कोणत्या बाजूला ठेवावा.
 
पाण्याच्या पेल्याची दिशा: जेवताना तुमचे तोंड उत्तर दिशेला असावे आणि नंतर पाण्याचा ग्लास उजव्या हाताकडे ठेवावा. म्हणजेच पेला पूर्व दिशेला ठेवा. तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असले तरीही उजव्या हातावर पाणी ठेवावे.
 
पोळी आणि भात : पोळी आणि भात नेहमी उजव्या बाजूला ठेवा कारण ते दोन्ही भाज्या आणि डाळींपेक्षा अधिक पवित्र मानले जातात.
 
इतर नियम:
 
* जेवणाचे ताट पाटावर ठेवून कुशाच्या आसनावर सुखासनमध्ये बसून भोजन करावे.
 
* कांस्य पात्रांमध्ये जेवण करण्यास मनाई आहे.
 
* जेवताना गप्प राहिल्याने फायदा होतो.
 
* जेवण भोजन कक्षातच करावे.
 
* अन्न अंगठ्यासह चारही बोटांनी एकत्र करून खावे.
 
* कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवण करावे.
 
* जेवणाच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत.
 
* दोन वेळचे जेवण करणाऱ्या व्यक्तीने वक्तशीर असणे आवश्यक आहे.
 
* संध्याकाळनंतर अन्न आणि पाणी त्याग केले पाहिजे.
 
* जेवणापूर्वी पाण्याचे सेवन करणे उत्तम मानले जाते, मध्यभागी मध्यम आणि जेवणानंतर सर्वात कमी.
 
* जेवणानंतर 1 तासाने पाणी पिऊ शकता.
 
* जेवणानंतर ताटात हात धुणे हा अन्नाचा अपमान मानला जातो.
 
* पाणी गाळून प्यावे आणि नेहमी बसून प्यावे.
 
* उभे राहून किंवा चालताना पाणी प्यायल्याने मूत्राशय आणि किडनीवर ताण पडतो.
 
* पाणी फक्त ग्लासातच प्यावे.
 
* अंजुलीत भरून प्यायलेल्या पाण्यात गोडवा निर्माण होतो.
 
* पाणी ठेवण्याची जागा ईशान्य दिशेला आणि स्वच्छ असावी. पाण्याची शुद्धता आवश्यक आहे.
 
* अन्न घेण्यापूर्वी गाय, कुत्रा आणि कावळा किंवा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या नावातून तीन चित्रावळ काढून ताटात बाजूला ठेवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती