हनुमानाचं कोणतं चित्र लावल्याने काय फळ मिळतं

रविवार, 25 एप्रिल 2021 (09:01 IST)
आपण हनुमानाचे खूप चित्र बघितले असतील. जसे हवेत उडत असताना, पर्वत उचलताना किंवा रामाची भक्ती करताना. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की त्या चित्रांबद्दल जे घरात लावल्याने त्यांची असीम कृपा प्राप्ती होते.
 
1. हनुमानाचे डोंगर उंचावतानाचे चित्र - हे चित्र घरात लावल्याने धैर्य, सामर्थ्य, विश्वास आणि जबाबदारी या भावनेची जाणीव होते. आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्यास लहान दिसेल आणि त्वरित त्याचे निराकरण होईल.
 
2. उडाण करणारे हनुमान - हे चित्र प्रगती, विजय आणि यश दर्शवतं. याने आपल्यात पुढे जाण्यासाठी उत्साह आणि धैर्याची भावना निर्माण होते. सतत तुम्ही यशाच्या वाटेवर जाता.
 
3. श्रीराम भजन करताना हनुमान - हे चित्र आपल्यात भक्ती आणि विश्वासाचा भाव भरुन देतं. हे चित्र आपल्या जीवनात यशाचा आधार आहे. या चित्राची पूजा केल्याने जीवनाचे ध्येय गाठण्यात येणारे अडथळे दूर होतात. 
 
4. दास हनुमान - श्रीरामाच्या चरणात बसलेल्या हनुमानाचे चित्र याला दास हनुमान म्हणतात अर्थात सदैव रामकाज करण्यासाठी तत्पर. दास हनुमानाची आराधना केल्याने व्यक्तीमध्ये सेवा आणि समर्पणाचा भाव विकसित होतो. आपल्या बैठकीत आपण श्रीराम दरबाराचं‍ चित्र लावू शकता ज्यात हनुमान रामाच्या पायाशी बसलेले दिसतात.
 
5. ध्यान करत असलेले हनुमान- या मुद्रेत हनुमान आपले डोळे बंद करुन सिद्धासन किंवा पद्मासन मध्ये ध्यान करताना ‍दिसतात. मोक्ष किंवा शांतीची अभिलाषा असल्यास हनुमानाचं हे चित्र लावावं.
 
6. शक्ती मुद्रेत हनुमान - जर आपल्याला आपल्या घरात भूत-प्रेत किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवत असेल तर हनुमानाचं शक्ती प्रदर्शन मुद्रा असलेलं चित्र लावावा. हे चित्र उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावं ज्यात मुख दक्षिण दिशेकडे असेल. यासाठी आपण पंचमुखी हनुमानाचं चित्र देखील लावू शकता.
 
7. पंचमुखी हनुमान - वास्तुविज्ञानानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते तेथे प्रगतीच्या मार्गात येणार्‍या अडचणी दूर होतात आणि धन-संपत्तीमध्ये वृद्धी होते. पंचमुखी हनुमानाचं चित्र दाराच्या आत ‍किंवा बाहेरच्या बाजूला लावता येऊ शकतं.
 
8. आशीर्वाद मुद्रेत हनुमान - आपल्या उजव्या हाताने आशीर्वाद देत असतील असं हनुमानाचं चित्र घरात लावल्याने हनुमानाची कृपा राहते आणि घरात सुख-शांती आणि समरसता राहते.
 
9. लाल हनुमानाचं चित्र - वास्तु शास्त्रानुसार घरात दक्षिण भिंतीवर हनुमानाचं लाल रंगाचं चित्र लावल्याने मंगळ अशुभ असल्यास शुभ परिणाम देतं सोबतच घरात गृह कलह असल्यास दूर होण्यास मदत होते. याने कुटुंबातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती