उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:36 IST)
दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात. वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे.
वास्तू उपचार -
1 वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा.
2 विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं.
3 दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा.
4 बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तू दोष असतो. कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे.
धन प्राप्ती -
1 घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी. जे दररोज नियमानं पूजा करतं त्यांचा घरात लक्ष्मी कायम स्वरुपी वास्तव्य करते.
2 दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा. असे केल्यानं घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार.
3 एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबऱ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद-कुंकू वाहून निरांजन ओवाळावी.
4 देवाची पूजा केल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. सतियावर तांदुळाचा ढिगारा रचून त्यावर एक-एक सुपारी वर कलावा बांधून ठेवा. या उपायाने धनप्राप्ती होते.
असं करू नये -
1 उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये.
2 उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये.
3 आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबऱ्यावर स्वच्छ करू नये.
4 उंबऱ्यावर उभारून कोणाचेही पाया पडू नये.
5 उंबऱ्यावर उभारून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमीच पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबऱ्याचा बाहेरून द्यावा.