Blue Aparajita भगवान विष्णूचे हे आवडते रोप आजच घरात लावा, आई लक्ष्मीच्या आशीर्वादाचा पाऊस पडेल, सर्व इच्छा पूर्ण होतील

मंगळवार, 5 जुलै 2022 (16:55 IST)
Vastu Benefits of Blue Aparajita वास्तुशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे घरामध्ये ठेवलेल्या वस्तू आणि दिशांचे तपशीलवार वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे झाडे आणि वनस्पतींचे महत्त्व देखील सांगितले आहे.
 
वास्तूमध्ये अशा अनेक झाडांचा आणि वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते. या वनस्पतींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. यापैकी एक गोकर्ण. गोकर्ण वेलीला कृष्णकांता किंवा विष्णुकांता असेही म्हणतात. त्याची फुले पांढरी आणि निळी असतात. धार्मिक श्रद्धेप्रमाणे निळ्या रंगाचे गोकर्णाचे फुलं भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. कृष्णकांताच्या वेलीला वास्तुशास्त्रात 'धन बेल' असेही म्हणतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार कृष्णकांताची वेल जसजसे वाढते तसतसे घरात सुख-समृद्धी वाढते. अशात निळ्या अपराजिताचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या दिशेला लावणे चांगले आहे हे जाणून घेऊया.
 
 
निळ्या गोकर्ण लागवडीचे फायदे
 
नकारात्मक ऊर्जा दूर होते
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये निळ्या गोकर्णाची लागवड केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते.
 
धनाची देवी लक्ष्मी आकर्षित होते
विष्णुप्रिया असल्यामुळे कृष्णकांता म्हणजेच निळी अपराजिता वेल धनलक्ष्मीलाही आकर्षित करते अशी धार्मिक धारणा आहे. ज्या घरात हे रोप लावले जाते. माता लक्ष्मी तिथे स्वतः वास करते आणि श्रीमंत होण्यासाठी केलेले कष्ट यशस्वी होतात.
 
बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते
घरामध्ये निळ्या रंगाची अपराजिताची वेल लावल्याने आणि ते फुलं विष्णूला अर्पित केल्याने घरातील सदस्यांची बुद्धी तीक्ष्ण होते. अशात कुटुंबाचा कधीच पराभव होत नाही.
 
निळ्या अपराजिताच्या फुलांनी शनिदोष दूर होतो
असे मानले जाते की कृष्णकांताची सुंदर निळी फुले म्हणजेच निळी अपराजिता वेल शनिदेवाला अर्पण केल्याने शनिदेवाच्या साडेसाती किंवा महादशाच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
 
गोकर्ण कोणत्या दिशेला लावावं ?
वास्तूनुसार घरामध्ये उत्तर दिशेला निळ्या रंगाची अपराजिता वेल लावावी. यामुळे शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते. लक्षात ठेवा ही वेल कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती