आग्नेय दिशा दोष असल्यास लाल रंगाचा एक बल्ब किंवा एक दिवा या प्रकारे लावा की किमान तो तीन तास जळत राहिला पाहिजे. यासाठी गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. याचा दोष दूर करण्यासाठी आग्नेय दिशेत मनीप्लांट लावायला पाहिजे. या दिशेत सूरजमुखी फूल, पालक, तुळस, गाजर, आलं, हिरवी मिरची, मेथी, हळद, पुदिना देखील लावू शकता.
या दिशेचे दोष दूर करण्यासाठी रेशमी परिधान, वस्त्र, सौंदर्यच्या वस्तू घरातील स्त्रियांना भेट म्हणून देऊन त्यांना प्रसन्न ठेवायला पाहिजे. तसेच या दिशेत शुक्र यंत्र लावायला पाहिजे.
दक्षिणपश्चिम दिशेचा दोष दूर करण्यासाठी जड मुरत्या ठेवायला पाहिजे. तसेच वाणीवर नियंत्रण देखील ठेवणे फारच गरजेचे आहे. दक्षिणपश्चिम दिशेत राहू मंत्राचा जप करायला पाहिजे. चांदी, सोनं किंवा तांब्याचे नाणे किंवा नागाची पूजा करून त्यांना दक्षिणपश्चिम दिशेत दाबून द्यायला पाहिजे. तसेच राहू यंत्राची स्थापना या दिशेत करायला पाहिजे.