एकाच देवतेच्या दोन मुर्ती देवघरात ठेवू नये.
भंगलेल्या किंवा जीर्ण झालेल्या मुर्ती अथवा फोटो ह्यांचे विसर्जन करा.
देवघराच्या बाजुला शौचालय किंवा अडगळीची खोली असु नये.
देवघराला कळस बसवू नका कळस फक्त मंदिरातच बसविले जाते.
दत्तक घेतलेल्या घराचे किंवा वंश पीडीत पूर्वज घराण्याचे देव पुजेत नसावे.
संसारी माणसांनी देवघरात मारूतीचे पूजन करू नये कारण मारूती हा बालब्रह्मचारी आहे. ह्यांमुळे वंश खंडीत होण्याची शक्यता असते.
शनिची किंवा शनियंत्राची पूजा देवघरात करू नये त्यामुळे जीवन संकटमय होते.
पूर्वजांचे टांक करून देवघरात ठेवू नका अथवा मुंजाची पूजा देवघरात करू नका.