बागकामामुळे घरात शांती आणि समृद्धी, त्यासाठी या गोष्टींकडे लक्ष्य दिले पाहिजे

गुरूवार, 2 मे 2019 (14:20 IST)
वास्तुशास्त्रात घरात झाड किंवा रोप लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार जर झाडांना योग्यरीत्या नाही लावले तर गृहस्वामी समेत कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. तर जाणून घ्या वास्तूच्या या नियमांना ज्याने तुमच्या घरात देखील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होऊ शकेल ....
 
वास्तुशास्त्रातील प्रसिद्ध ग्रंथ ’वास्तुराजवल्लभानुसार तुळस, केळी, चंपा, चमेली इत्यादी झाड शुभ मानले गेले आहेत. केळीच्या झाडाला ईशान्य कोपर्‍यात लावायला पाहिजे ज्याने धन-धान्यात वृद्धी होते.
 
अशी मान्यता आहे की केळीच्या झाडाजवळ तुळस लावली तर जास्त शुभ परिणाम मिळतात आणि विष्णूसोबत लक्ष्मीची कृपा देखील सदैव राहते.
 
अशोक आणि नारळाचे झाड लावणे फारच शुभ मानले गेले आहे. आपल्या नावानुसार अशोक प्रसन्नता देणारा आणि शोक दूर करणारा वृक्ष आहे. मान्यता अशी आहे की ह्या झाडामुळे घरातील सदस्यांमध्ये आपसातील प्रेम वाढत.
 
चिनी वास्तुशास्त्राची अशी मान्यता आहे की घराजवळ बांबूचे झाड का किंवा घरात त्याचा बॉन्सायी रूप लावायला पाहिजे ज्याने समृद्धी आणि प्रगती होते. असे मानले गेले आहे की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
प्राचीन भारतीय ग्रंथ बृहत्संहितांनुसार, असे झाड, रोप ज्यांच्या पानांमध्ये आणि शाखा तोडल्याने दूध किंवा पांढरा स्राव होतो, तसे झाड किंवा वृक्ष घराजवळ नाही लावायला पाहिजे. अशी मान्यता आहे की याने धन हानी होण्याची शक्यता असते.
 
भारतीय वास्तुशास्त्रानुसार, काटेरी झाड रोपटे घराच्या मुख्य दारावर आणि घराजवळ असणे शुभ नसत. म्हटले जाते की यामुळे शत्रू भय वाढतो आणि जीवनात काही ना काही त्रास सदैव बनून राहतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती