मुलांच्या जीवनात त्यांच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. एक शिक्षक मुलांना ज्ञानच देत नाही तर जीवनातील महत्त्वाचं पाठ देखील समजावून सांगतात. शिक्षणचं व्यक्तीला जीवनात प्रगतीच्या मार्गावर नेतं. दरवर्षी शिक्षकांच्या सन्मानात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जाणून घ्या या दिवशीचा इतिहा आणि महत्तव-
भारतात पहिला शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला
भारतात पहिला शिक्षक दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला. भारताचे माजी राष्ट्रपति आणि महान शिक्षाविद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला होता. हा दिवस साजरा करण्यासाठी एकदा राधा कृष्णन यांच्याकडे त्यांचे काही शिष्य आले आणि त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली तेव्हा राधा कृष्णन यांनी म्हटले की माझा वाढदिवस वेगळ्याने साजरा करण्यापेक्षा जर शिक्षक दिन या रुपात साजरा केला जाईल तर मला जास्त गर्व होईल. यानंतर 5 सप्टेंबर हा दिवस टीचर्स डे रुपात साजरा होत आहे.
शिक्षकांचा सन्मान
या दिवशी शाळेत तसंच कॉलेजमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सन्मान करुन हा दिवस साजरा करतात. आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात, त्यांच्याकडून शिकलेलं अनुभव सांगतात, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. कारण शिक्षक मनुष्याच्या जीवनातील अत्यंत महत्तवाची व्यक्ती असते.