घडविले शिल्प गोळ्यातून मातीच्या,
किमयागार असे तू, सर्वांच्या जीवाचा,
लहानखोर बोटांत गिरवले अक्षर,
सर्वानाच केलंय तुम्हीच साक्षर,
शिक्षक रुपी ,देव भुमीवरी आले,
परीस स्पर्श अवघा, करुनिया गेले,
असा नसावा कुणी ज्यास नसेल गुरूकुणी
कशी ऐकेल मग तो
त्यांची अमृतवाणी
नमन माझे समस्त शिक्षक वृंदासी,