कृती-
सर्वात आधी बीट सोलून त्याचे तुकडे करावे. आता ते गॅसवर पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात उकळवून घ्यावे. उकळल्यानंतर, बीटचे पाणी वेगळे करून ते थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर ते मिक्सर जारमध्ये घालून बारीक करावे. यानंतर, एका भांड्यात मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, बीटरूट पेस्ट, रोज एसेंस, बटर आणि मॅश केलेली केळी घालावी. या सर्व गोष्टी नीट मिसळल्यानंतर, थोडे थोडे दूध घालावे आणि ते मिक्स करून गुळगुळीत मिश्रण बनवावे. आता गॅसवर पॅन ठेवा आणि तो गरम करा आणि त्यावर बटर लावा. थोडे गरम झाल्यावर त्यात छोटे पॅनकेक्स घाला आणि दोन्ही बाजूंनी बेक करावे. ते एका प्लेटमध्ये काढावे. तसेच वरून मध, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीने सजवून घ्यावे. तर चला तयार आहे रोझ डे विशेष हेल्दी बीटरूट पॅनकेक, पार्टनरला नक्कीच सर्व्ह करा.