Vasant Panchami Special Recipe: केशरी भात

रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (07:57 IST)
साहित्य-
100 ग्राम तांदूळ
100 ग्राम साखर  
1 चमचा केशरी रंग किंवा केशर दूधात भिजवून
5 चमचे तूप
काजू
बदाम
सुके मेवे
1 कप ओल्या नारळाचा खोवलेला किस  
1/2 लिंबू
5 लवंगा  
वेलदोडा पूड
ALSO READ: रुचकर केळीचा हलवा रेसिपी
कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. आता पातेलीत तूप घालून लवंग परतून घ्यावा. तसेच त्यात तांदूळ घालावे. मोकळा भात करून घ्यावा. दुसऱ्या पातेलीत साखर, एक वाटी पाणी, खोबरे, केसर घालून शिजवून एक तारी पाक तया करावा आणि भातावर ओतावा. भाताला पुन्हां एक वाफ देऊन लिबाचा रस घालावा. नंतर सुके मेवे घालावे. तर चला तयार आहे आपला या वसंत पंचमी विशेष केशर भात रेसिपी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती