कृती-
सर्वात आधी रसमलई दूध तयार करण्यासाठी एका भांड्यात कंडेन्स्ड मिल्क, साखर, वेलची पूड, केशर आणि मिल्क पावडर घाला व मिक्स करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. तसेच कलाकंद बनवण्यासाठी आता पनीर किसून घ्या, त्यात दूध पावडर, साखर, दूध, केशर आणि वेलची पावडर घाला आणि गॅसवर ठेवा. सर्वकाही मिसळा आणि मध्यम आचेवर चांगले शिजवा, ते पॅनपासून वेगळे होईपर्यंत शिजवा. पनीर चांगले शिजल्यावर, ट्रेवर तूप लावा आणि हे पनीर मिश्रण सेट करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. नंतर कलाकंद कापून रसमलईच्या रसात भिजवा. तर चला तयार आहे आपली महाशिवरात्री विशेष रसमलाई कलाकंद रेसिपी.