साहित्य- 1 कप गहू, अर्धा चमचा वेलची पूडल, 5 बदाम आणि 5 काजूचे तुकडे, 10 मनुका, 1 कप गूळ, 4 चमचे साजूक तूप
कृती
गहू स्वच्छ करून धुवून रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी भिजलेला गहू कुकरमध्ये शिजवा. मध्यम आचेवर साधारण 8 ते 10 शिट्ट्या होऊ द्या. गहू शिजायला थोडा जास्त वेळ लागतो.
आता गहू मिक्सरमध्ये भरडून घ्या किंवा मग फेटून घ्या.
कढईमध्ये तूप घाला. तूप तापल्यानंतर त्यात काजू- बदामाचे तुकडे परतून घ्या. नंतर मनुका घाला.
नंतर गव्हाची भरड टाका 5 मिनिटे परतून घ्या.
गहू व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात पाणी घाला. गहू शिजवून उरलेलं पाणी खिरीत टाका.
गहू आणि पाणी एकजीव झालं की त्यात किसलेला गूळ घालून 10 मिनिटे शिजवून घ्या.
गरज भासल्यास शिजताना वरुन जरा पाणी घाला.
खीर शिजत आल्यावर त्यात वेलची पूड घाला.
खीर सर्व्ह करताना त्यात दूध घालून सर्व्ह करा.
गरम खीर हवी असल्यास गरम दूध आणि गार हवी असल्यास गार दूध वापरा.