सर्वात आधी ब्रेडचे किनारे कापून टाकावे. आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेड कापून घ्यावा. आता एका पॅनमध्ये दूध गरम करावे. व त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यानंतर गाळून घ्यावे. आता हा छेना थंड पाण्यात घालून नंतर ब्रेडच्या तुकड्यांसोबत मिक्स करा. व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून साईडला ठेवा. आता एका पॅनमध्ये पाणी आणि साखर घालावी. यामध्ये वेलची पूड घालावी. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये हे बॉल्स सोडावे. व 15 मिनिट साखरेच्या पाकात उकळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले ब्रेड रसगुल्ले आता हे रसगुल्ले पाकातून काढून थंड करावे. मग यावर मेवे टाकून सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.