हिवाळ्याच्या हंगामात, मकर संक्रांतीचा सण येतो. मकर संक्रांतिला भोगीची भाजी, बाजरीची भाकर, खिचडी आणि गूळ पोळीचा बेत हमखास असतो. या व्यतिरिक्त तिळगुळाचे लाडू देखील बनवतात. चिक्की आपण अनेक प्रकारे बनवू शकतो, पण यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळाची चिक्की बनवा. जाणून घ्या साहित्य आणि कृती
सोबतच सर्व ड्रायफ्रुट्स चिरून एका भांड्यात ठेवा. गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात 1 ते2चमचे साजूक तूप घालून सर्व काजू भाजून घ्या. नंतर त्याच पातेल्यात 5 चमचे तूप टाकून ते वितळवून घ्या.तुपातून धूर निघू लागल्यावर त्यात तीळ टाकून हलके परतून गॅस बंद करा. आता आपण तीळ थंड होण्यासाठी ठेवा.
नंतर कढईत 5 चमचे तूप घालून गरम करा. आता त्यात गुळाचे छोटे तुकडे टाका
आणि गूळ वितळवून घ्या. गुळाला ढवळत राहा.यानंतर, त्यात तीळ घालून 30 सेकंद ढवळत राहा.
नंतर त्यात काजू, वेलची पूड , नारळ घालून सुमारे 10 मिनिटे शिजू द्या.
गूळ आणि तीळ नीट शिजायला लागल्यावर गॅस बंद करून तूप लावलेल्या प्लेटवर पसरवा. सांचे असल्यास, ते देखील वापरले जाऊ शकते. 2 मिनिटांनी तीळ बर्फी किंवा चिक्कीच्या आकारात कापून घ्या.