Makar Sankranti 2023 Special Recipe: तिळगुळ लाडू, रेसिपी

शनिवार, 14 जानेवारी 2023 (12:16 IST)
साहित्य:
1 कप तीळ.तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणेकूट,अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, वेलची पूड.
 
कृती: तीळ खरपूस भाजून घ्या. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ टाका  मध्यम आचेवर भाजून घ्या.
 भाजून झाल्यावर, गूळाला शिजवून घ्या.
 गुळाला शिजवण्यासाठी दुसऱ्या कढईत तूप टाकून गरम करावे.
 तूप गरम झाल्यावर गुळ टाका व त्याला आणि  मध्यम आचेवर शिजवून घ्या.
गुळ शिजला की गॅस बंद करून त्यात भाजलेली तीळ टाका मग शेंगदाणे कूट , खोबर्‍याचा कीस घालून चांगले ढवळा. त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत. 

Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती