केवडा किंवा गुलाब पाणी 1/2 चमचा
कृती-
गुळाचा रसगुल्ला बनवण्यासाठी सर्वात आधी दूध उकळण्यास ठेवावे. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. दूध फाटल्यानंतर ते कॉटनच्या कपड्यात घालावे. दुधामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून लिंबाचा आंबट पणा दूर करावा. आता या कपड्यावर वजनदार वस्तू ठेवावी. पाणी निघून गेल्यानंतर हे मिश्रण हाताने मळून त्याचे गोळे तयार करून घ्या. आता गुळाचा पाक बनवण्यासाठी पॅनमध्ये पाण्यात गूळ घालून उकळून घ्या. आता पाक उकळल्यानंतर त्यामध्ये हे बॉल्स घालावे व दहा मिनिट शिजू द्यावे. रसगुल्ला तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. आता केवडा वॉटर किंवा गुलाब पाणीमध्ये टाकून थंड करावे. तर चला तयार आहे आपले गुळाचे रसगुल्ले, जे तुम्ही नैवेद्यात देखील ठेवू शकतात.