नवरात्रोत्सव 2024 : उपवास रेसिपी सीताफळ खीर

शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (06:36 IST)
आक्टोंबर मध्ये शारदीय नवरात्रोत्सव 2024 ला सुरवात होणार आहे. अनेक जण दहा दिवस उपवास करतात. तसेच अनेक वेळेला उपवासाला चालणार नवीन पदार्थ काय बनवावा हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो म्हणून आज आम्ही तुम्हाला उपवासाला चालणार आणखीन एक गोड पदार्थ सांगणार आहोत जो आहे सिताफळ खीर. सीताफळ हे फळ सर्वांना माहित आहे. याच सीताफळाची आज आपण खीर कशी बनवावी हे पाहू या. तर चला जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
2-3 सीताफळ 
1 लीटर दूध
1/2 कप साखर 
2-3 चमचे काजू, बादाम, पिस्ता कापलेले 
2-3 चमचे तूप 
1/2 चमचे वेलची पूड 
 
कृती-
सर्वात आधी सीताफळ मधील बिया वेगळ्या करून त्यातील गर काढून घ्या. आता एका पॅनमध्ये तूप घालून ते गरम करावे व त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता बाजून घ्या. आता भाजलेले काजू, बदाम, पिस्ता एका बाऊलमध्ये काढून त्याच पॅनमध्ये दूध घालून उकळी येऊ द्यावी. जेव्हा दूध घट्ट होईल तेव्हा त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालावी. तसेच थोड्या वेळाने यामध्ये सीताफळाचा गर घालावा व ढवळावे. आता भाजलेला सुकामेवा खीर मध्ये घालावा व ढवळावे. तर चला तयार आहे आपली सीताफळ खीर, तुम्ही सीताफळ खीर गरम किंवा थंड देखील सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती