पिकलेल्या फणसापासून बनवा ह्या अप्रतिम रेसिपी

गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (06:36 IST)
आजकाल फणस बाजारात सहज मिळते. फणस हे अनेकांना आवडते. फणसाची गोड गरे खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. तर चला आज आपण पाहणार आहोत पिकलेल्या फणसापासून अप्रतिम रेसिपी. तर चला जाणून घ्या रेसिपी.
 
1. फणस शेक 
साहित्य- 
1 कप पिकलेले फणस 
1 कप दूध
2 चमचे साखर
1/2 कप व्हॅनिला आइस्क्रीम
बर्फाचे तुकडे
 
कृती-
फणस शेक बनवण्यासाठी पिकलेल्या फणसाचे तुकडे मिक्सरमध्ये टाकावे. त्यात दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे घालावे. जर तुम्हाला क्रीमी शेक आवडत असेल तर तुम्ही व्हॅनिला आइस्क्रीम देखील घालू शकतात. मिश्रण चांगले मिक्स करा. तयार शेक ग्लासमध्ये घालून आणि थंडगार सर्व्ह करा.
 
2. फणस हलवा
साहित्य- 
1 कप पिकलेले फणस बारीक केलेले 
1/2 कप साखर
1/4 कप तूप
1/4 कप ड्राय फ्रूट्स
1/2 चमचा वेलची पूड 
  
कृती-
फणस हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत फणसाची पेस्ट टाकावी आणि लहान गॅस वर शिजवावी. 
फणस शिजला की त्यात साखर घालून मिक्स करावी. आता थोडं तूप घालून चांगलं परतवून घ्या. 
जेव्हा मिश्रण तूप सोडू लागेल तेव्हा त्यात काजू, बदाम आणि वेलची पूड घालावी. हलवा पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आणखी काही मिनिटे शिजवा. हलवा एका भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या व सर्व्ह करा.
 
3. फणस बर्फी 
साहित्य-   
2 कप पिकलेले फणस चिरलेला 
1 कप खवा 
1 कप साखर
1/2 कप नारळाचे तुकडे
2 चमचे तूप
1/2 चमचा वेलची पूड 
पिस्ता गार्निशसाठी 
  
कृती-
फणस बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत तूप गरम करून त्यात फणसाचे तुकडे तळून घ्यावे.  फणस मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्याच पॅनमध्ये फणसाची पेस्ट घालून शिजवून घ्या.आता त्यामध्ये खवा आणि साखर मिक्स करावी. मग नारळाचे तुकडे आणि वेलची पूड मिक्स करावी. व हे मिश्रण घट्ट होइसपर्यंत शिजवा. हे मिश्रण एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये पसरवा आणि पिस्त्याने सजवा.थंड झाल्यावर बर्फीचे तुकडे करून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती