Sweet Recipe : दुधी भोपळ्याची खीर रेसिपी

सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (07:00 IST)
साहित्य-  
1 कप किसलेला दुधी भोपळा 
2 कप दूध 
1 कप पाणी 
2 चमचे साखर
1 चमचा वेलची पूड
2 चमचे बारीक चिरलेला ड्रायफ्रुट्स   
आवश्यकेतूनर तूप 
 
कृती-
सर्वात आधी दुधी भोपळा स्वच्छ धवून त्याचे साल काढावे. व किसून घ्यावा. आता एका पातेलीत दूध घेऊन गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा घालावा. आता यामध्ये साखर घालून चवीनुसार वेलीची पूड घालावी. नंतर हवा असल्यास दूध मसाला घालावा. व ड्राय फ्रूट्स घालावे  व वरून थोडेसे तूप घालावे. आता 10 ते 15 मिनट शिजवल्यानंतर एका बाऊलमध्ये काढावे व वरतून काजू बदाम गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली दुधी भोपळ्याची खीर, जी तुम्ही नैवेद्यात देखील ठेऊन शकतात किंवा अचानक पाहुणे आल्यास त्यांना सर्व्ह देखील करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती