आरोग्यवर्धक बाजरीचे लाडू रेसिपी

गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (19:46 IST)
साहित्य-
बाजरीचे पीठ
तूप
गूळ
खजूर
डिंक
वेलची पूड 
नारळाचा किस 
बारीक चिरलेले सुके मेवे 
ALSO READ: रुचकर केळीचा हलवा रेसिपी
कृती- 
सर्वात आधी डिंक तुपात भाजून घ्या. यानंतर तो बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये पांढरे तीळ घाला आणि ते हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. भाजल्यानंतर ते बाहेर काढा आणि बाजूला ठेवा.आता सुका मेवा आणि खरबूज बिया तुपात भाजून बाजूला ठेवा.त्याच पॅनमध्ये तूप गरम करा आणि या तुपात बाजरीचे पीठ हलक्या सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. आता मंद आचेवर गूळ वेगळा वितळवा. जर तुम्ही खजूर वापरत असाल तर बिया काढून ब्लेंडरमध्ये मिसळा. नंतर भाजलेल्या बाजरीच्या पिठामध्ये गूळ किंवा खजूर घाला. तसेच भाजलेले सुके मेवे आणि बिया, नारळाचा किस, डिंक, वेलची पूड घाला. ते चांगले मिसळा आणि त्याला लाडूचा आकार द्या. तर चला तयार आहे आपले आरोग्यवर्धक  बाजरीचे लाडू रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: अननसाचा शिरा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती