गुलाब जामुन रेसिपी Gulab Jamun Recipe

गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य - 100 gms मावा, 1 टेबल स्पून मैदा किंवा रवा, 1/4 टी स्पून बेकिंग सोडा, 2 कप साखर, 2 कप पाणी, 2 टेबल स्पून मिल्क, 4 वेलची,
 
गुलाब जामुन बनवण्याची कृती
एका बाउलमध्ये खवा चांगल्यारीत्या मॅश करुन घ्या.
यात मैदा आणि बेकिंग सोडा मिसळून गोळा तयार करा.
मिश्रण नरम आणि लवचिक असलं पाहिजे.
याचे लहान-लहान बॉल्स तयार करा.
कढईत तूप घालून तापवून घ्या.
आच कमी करुन यात गोळे घालून सतत हलक्या हाताने ढवळत तळून घ्या.
तळताना हे एकमेकाला चिटकू नये याची काळजी घ्या.
या प्रकारे वेगवेगळ्या खेपमध्ये सर्व गोळे तळून  घ्या.
पाक तयार करण्यासाठी पाण्यात साखर घालून मंद आचेवर शिजू द्या.
सतत ढवळत राहा.
घट्ट होयपर्यंत शिजवा. 1 तारी पाक तयार करा. यात वेलची घाला.
नंतर जरा गार झाल्यावर यात गुलाब जामुन घाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती