Anant Chaturdashi 2023: गणपतीला निरोप देण्यापूर्वी बेसन हलवाचा नैवेद्य द्या, रेसिपी जाणून घ्या

सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (15:32 IST)
Anant Chaturdashi 2023:सध्या सर्वत्र गणपती उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.घरोघरी उत्साहाने बाप्पाची स्थापना केली जाते. 10 दिवस हा उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. बाप्पाला दररोज वेगवेगळे नैवेद्य दाखवतात. 
हा उत्सव गणेश चतुर्थी पासून सुरु होऊन अनंतचतुर्दशी पर्यंत चालतो. अनंतचतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. गणपतीचे विसर्जन करतात. या विसर्जनाच्या दिवशी गणपतीसाठी बेसन हलवाचा नैवेद्य द्या. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
बेसन - 1 कप
साजूक तूप - दीड कप
साखर - ½ कप
दूध - 2 कप
वेलची - 6 ते 7 (पावडर)
सुका मेवा (आवश्यकतेनुसार बारीक चिरून)
 
कृती- 
 बेसनाचा हलवा करण्यासाठी सर्वप्रथम कढईत साजूक तूप घाला. नंतर बेसन घालून बेसन सोनेरी रंगाचे होई पर्यंत भाजून घ्या. बेसन भाजल्यावर त्यात साखर घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. आता त्यात दूध घालून ढवळून घ्या. जेणे करून त्यात गुठळ्या होणार नाही. आता त्यात बारीक चिरलेले सुके मेवे घाला. गरम हलवा तयार. आता बाप्पाला नेवेद्य द्या. 
 
 Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती