खमंग बेसनाचे लाडू

गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (16:43 IST)
साहित्य: तीन वाटी जाड बेसन, दोन वाटी पिठी साखर किंवा बुरा साखर आवडीप्रमाणे, पिस्ता, बदामाचे काप, 1 लहान चमचा वेलची पूड, एक ते दीड वाटी साजूक तूप
कृती: सर्वात आधी गॅसवर कढई गरम करुन घ्यावी. त्यात एक वाटी तूप घालून बेसन छान रंग येईपर्यंत सतत चालवून खमंग भाजून घ्यावं. आपल्या गरजेप्रमाणे आपण तूप वाढवू शकता. बेसन भाजल्यावर गॅस बंद करुन द्यावा. आपल्याला हवा तो रंग येण्यापूर्वीच गॅस बंद करावा. आणि गॅस बंद करुन गरम कढईत बेसन हालवत राहा. 
 
नंतर बेसन गार झाल्यावर त्यात साखर मिसळून एकजीव करुन घ्या. त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड मिसळून लाडू वळून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती