आंब्याच्या दशम्या

आंब्याचा रस थोडा आंबट झाला असेल तर आपण त्या रसाने चविष्ट दशम्या तयार करू शकता.

साहित्य: आमरस, पिठीसाखर, मिरीपूड, मीठ, आलं, लाल मिरची, चिमूटभर दालचिनी पूड, एक चमचा तूप, गव्हाचं पीठ, एक चमचा तांदळाच पीठ, दूध.

कृती: सर्व साहित्य एकत्र करून आमरसात मळून घ्या. गव्हाच्या पिठाप्रमाणेच या मिश्रणाच्या पोळ्या लाटा आणि तव्यावर गुलाबी होईपर्यंत भाजा. पोळ्या फुगू द्यायच्या नाही, हे लक्षात ठेवा. पोळी फुगत असेल तर चमच्याने दोनचार टोचे मारा. मिक्स चवीच्या या पोळ्या तुपाबरोबर खा. या पोळ्या तीनचार दिवस सहज टिकतात.
 

वेबदुनिया वर वाचा