मुलांचा स्टडी टेबल कसा असावा

गुरूवार, 7 जुलै 2022 (22:58 IST)
घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुम्ही मुलांचे स्टडी टेबल ठेवू शकता. फक्त तिथं गोंगाट नसावा आणि चांगला उजेड असावा.
 
स्टडी टेबलच्या जवळपास जर एखादं सुकलेलं रोप असेल तर ते काढून टाकून तिथं एक हिरवगार ताज रोप लावावं.
 
जर टेबलच्या समोर लक्ष विचलित करणारं पोस्टर किंवा चित्र लावलं असेल तर ते काढून टाका. त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाइमटेबल लावू शकता.
 
पेन, पेन्सिल, पट्टी, रबर, शार्पनर इत्यादी सर्व गोष्टी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवा म्हणजे अभ्यास करताना सारखं मुलांना उठावं लागणार नाही.
 
मुलांना बेडवर झोपून वाचण्याची सवय असेल तर ती खोडून काढा. कारण त्यामुळे झोप येते.
 
स्टटी टेबल अथवा मुलं बसत असलेली खुर्ची आणि टेबल यांची उंची योग्य असावी. खुर्चीवर नेहमी ताठ बसण्यास मुलांना शिकवाव.
 
एकूणच, स्टही टेबल हे नेहमीच नीटनेटकं आणि स्वच्छ असावं, त्यामुळे अभ्यास करायला उत्साह येतोच पण मन एकाग्र व्हायलाही वेग लागत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती