कपड्याची किंवा बॅगेची चेन घरच्या घरी दुरुस्त करण्यासाठी टिप्स

गुरूवार, 1 एप्रिल 2021 (09:11 IST)
बऱ्याच वेळा असे बघतो की आपल्या बॅगची ,पर्सची चेन किंवा कपड्याची चेन खराब होते. प्रत्येक वेळी बाहेर जाऊन दुरुस्त करणे शक्य नसते. या साठी काही हॅक्स सांगत आहोत. जे आपल्या कमी येतील. 
 
1 इअरबड आणि ऑलिव्ह ऑइल -पॅन्टची चैन लागत नसेल किंवा त्यात गंज लागले असल्यास इयरबड ने त्या चैन वर ऑलिव्ह ऑइल लावा जेणे करून चैन व्यवस्थित काम करेल.   
 
2 मुलांचे मेणाचे रंग- आपण हे ऐकलेत असेल की खराब चैनवर मेणबत्ती घासल्याने चैन दुरुस्त होते.तसेच मुलांचे में रंग देखील या साठी कामी येतात. हे रंग चैनवर घासा नंतर चैन लावून घ्या. 
 
3 पेन्सिल- पेन्सिलवर असलेले ग्रॅफाइट देखील चैन दुरुस्त करण्यासाठी प्रभावी आहे. पेन्सिल ला चैन वर चोळा नंतर उघडझाप करा चैन दुरुस्त होईल.
 
4 पेट्रोलियम जेली - बॅगेची किंवा कपड्याची खराब झालेली चैन दुरुस्त करण्यासाठी आपण पेट्रोलियम जेली चा वापर करू शकता. या मुळे चैन वर जास्त प्रमाणात जेली लावू नका नाही तर कपड्यांवर डाग पडतील. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती