या चुकांमुळे नाती दुरावतात, अशी चूक करू नये

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (22:58 IST)
नाती बनविणे खूप सोपे आहेत पण त्यांना जपून ठेवणं खूपच कठीण आहे. जर आपल्याकडून कधी काही चूक झाली असेल तर ती स्वीकारून शक्य असल्यास तशी चूक करू नका. जेणे करून नातींमध्ये गोडवा टिकून राहील.परंतु काही लहान लहान चुका अशा असतात ज्यांच्या मुळे नाती दुरावतात किंवा तुटतात.चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या आहे त्या चुका ज्यांच्या मुळे नाती दुरावतात.
 
1 दबाब आणणे - 
आपण आपल्या जोडीदारावर पुन्हा -पुन्हा बोलण्यासाठी दबाब आणता . ती किंवा तो कामात असल्यावर त्यांना वारंवार बोलण्यासाठी बाध्य केले जाते ज्या मुळे ते वैतागतात. असं करणं अजिबात योग्य नाही. सगळ्यांची आपापली कामे असतात ज्यामुळे प्रत्येक जण व्यस्त असतो अशा कामाच्या वेळी त्याला त्रास देणं चांगले नाही तो किंवा ती काम संपल्यावर आपल्याशी बोलेलच परंतु कामात असताना त्रास देणं आणि त्यांना पुन्हा पुन्हा बोलण्यासाठी दबाब देणं चुकीचं आहे या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
 
2 संशय घेणं -
संशय करणं म्हणजे प्रेमात मीठ पडणं . जर आपल्या जोडीदाराचा फोन बिझी येत असेल तर असा विचार करू नका की तो किंवा ती इतर कोणाशी बोलत आहे. फोन ऑफिसचा किंवा कामाचा देखील असू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या वर संशय घेऊन जाणीव करून देऊ नका की त्याच्या वर किंवा तिच्यावर आपला विश्वास नाही. 
 
3 भूतकाळावर बोलणं -
आपण आपल्या जोडीदाराला वारंवार भूतकाळाची आठवण करून दिल्यावर भविष्यात समस्या उदभवू शकते. असं करू नका जर भूतकाळात घडलेल्या चुकीचे वारंवार बोलले गेले आणि त्यामुळे भागीदाराला खाली बघत असाल तर हे चुकीचे आहे असं करू नका. या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.  
 
 
4 रागावणे- 
जर आपल्या जोडीदाराला आपली गरज आहे आणि आपण उगाच रागावता किंवा चिडचिड करता तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. राग आणि चिडचिड कोणाला ही होऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला किंवा तिला सर्वात जास्त आपली गरज आहे तेव्हा त्याला किंवा तिला समजून घ्या आणि प्रेमाची वागणूक द्या. अशा वेळी जर आपण राग करता तर असं करू नका हे चुकीचं आहे. या मुळे जोडीदारास त्रास होऊ शकतो. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती