देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागले आहे. या मुळे लोक आपापल्या घरात आहे. घरात राहावे लागत आहे या मुळे लोक कंटाळवाणी झाले आहेत. काही तरुण वर्गाचा कल या काळात ऑनलाईन डेटिंग कडे वाढत आहे. परंतु ही ऑनलाईन डेटिंग कितपत सुरक्षित आहे. तसेच ऑनलाईन डेटिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी आणि खबरदारी घेतली पाहिजे जाणून घ्या.
* आपले फोटो सामायिक करू नका- जेव्हा आपण एखाद्याशी डेटिंगच्या माध्यमातून जुडतो तेव्हा आपण त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा करतो. आपण आपले नंबर सामायिक करतो. अशा वेळी आपण त्या अनोळखी व्यक्तीशी न कळत जुडत जातो.लक्षात ठेवा की आपण आपले फोटो सामायिक करू नये. तो अनोळखी व्यक्ती त्या फोटोंचा गैर वापर देखील करू शकतो.