प्रत्येकजण आपले घर सजवतो. लोक अनेकदा त्यांचे घर सजवण्यासाठी महागडे फर्निचर खरेदी करतात. पण जर फर्निचरमध्ये वाळवी शीरली तर महागड्या फर्निचर खराब होतो. विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळ्यात वाळवी लागते. ज्या वस्तूंना वाळवी लागते त्या वस्तूंना वाळवी आतून पोकळ करून टाकते. अशा परिस्थितीत आपल्या घरातील फर्निचरला वाळवी पासून वाचवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
फर्निचरमध्ये पाणी लागल्याने ते खराब होऊ लागते आणि त्यात वाळवी लागते. हे टाळण्यासाठी घरातील फर्निचरभोवती पाणी साचू देऊ नका. वाळवी ओलसर किंवा आद्र्रता असलेल्या ठिकाणी अधिक वाढतात, म्हणून ही समस्या दूर करा.