चष्मा साफ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (20:55 IST)
डोळ्यांवर घातलेला चष्मा स्वच्छ करण्यासाठी, लोक सहसा कापड किंवा त्याच्या शेजारी ठेवलेल्या सूटचा दुपट्टा वापरतात. पण हे चष्मे स्वच्छ करण्याचा हा योग्य मार्ग आहे का? चष्म्याची काच नीट साफ केली नाही तर चष्म्याच्या काचेवर ओरखडे येतात आणि त्याचा आपल्या डोळ्यावर देखील परिणाम होतो. अशा परिस्थितीत चष्मा स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा.
 
टूथपेस्टचा वापर- चष्म्याचा काच स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडी टूथपेस्ट लावून  काच सुती कापडाने हळुवार घासून सुमारे 30 सेकंद पर्यंत स्वच्छ करा. काचेवरील ओरखडे देखील साफ होतील. 
 
शेव्हिंग फोम- चष्मा स्वच्छ करण्यासाठी प्रथम काचेवर शेव्हिंग फोम लावा आणि काही वेळ तसाच राहू द्या. काचेवर काही काळ शेव्हिंग फोम लावून ठेवल्याने काचेवरील धूळ आणि घाण फोम शोषून घेतो आणि चष्मा स्वच्छ होतो. काही वेळाने सुती कापडाने काचा  स्वच्छ करा. 
 
लिक्विड ग्लास क्लीनर - लिक्विड ग्लास क्लीनर हा चष्मा स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बर्‍याच लिक्विड ग्लास क्लीनरमध्ये अल्कोहोल असते, जे काच साफ करण्याबरोबरच हँड सॅनिटायझर म्हणून काम करते. ज्याच्या मदतीने तुम्ही चष्मा स्वच्छ करण्यासोबत हात स्वच्छ करू शकता. 
 
चष्मा साफ करताना या चुका करू नका- 
आपण ही अशा लोकांपैकी असाल जे चष्म्यावरील डाग साफ करण्यासाठी साबण किंवा कोणत्याही डिटर्जंटची मदत घेतात, तर पुढच्या वेळी असे करणे टाळा.आपल्या या सवयीमुळे चष्मा खराब होऊ शकतो. वास्तविक, अनेक डिटर्जंट कठोर आणि कोरडे असतात, जे चष्म्याची चमक खराब करतात. चष्मा स्वच्छ करण्यासाठी फक्त सुती कापड वापरा. 
अनेक लोक चष्मा स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरतात, ज्यामुळे डोळ्यांना हानी पोहोचते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती