ट्रॉली बॅग स्वच्छ करण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:49 IST)
जेव्हाही आपण प्रवासासाठी जातो तेव्हा अनेकदा आपले सामान ठेवण्यासाठी ट्रॉली बॅग वापरतो. ट्रॉली बॅगमध्ये सामान घेऊन जाणे खूप सोपे आहे. मात्र अनेकदा ट्रॉली बॅग वापरल्यानंतर ती साफ करण्याकडे आपण लक्ष देत नाही. अशा स्थितीत ट्रॉली बॅगवर घाण साचते. बर्‍याच लोकांना वाटते की ट्रॉली बॅग साफ करणे खूप कठीण होईल. पण ते तसे नाहीआज आम्‍ही आपल्याला ट्रॉली बॅग घरी सोप्या पद्धतीने  साफ करण्‍यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत  चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 गरम पाणी आणि मीठ - जर आपल्याला ट्रॉली बॅग स्वच्छ करायची असेल तर यासाठी गरम पाणी आणि मीठ वापरू शकता. यामुळे आपली ट्रॉली बॅग काही मिनिटांत स्वच्छ होईल. यासाठी ट्रॉली बॅग पूर्णपणे रिकामी करावी. नंतर गरम पाण्यात मीठ घालून त्यात एक कापड बुडवून पिळून घ्या. आता या कापडाने ट्रॉली बॅग पूर्णपणे पुसून टाका. यानंतर काही वेळ ट्रॉली बॅग पंख्याच्या हवेत किंवा सूर्यप्रकाशात ठेवा.
 
2 व्हाईट व्हिनेगर -जर ट्रॉली बॅगमध्ये घाणीसह बुरशी आली असेल, तर ती साफ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. यासाठी एका भांड्यात एक कप व्हाईट व्हिनेगर घेऊन त्यात एक कापड भिजवून ते पिळून घ्या. आता या कापडाने ट्रॉली बॅग स्वच्छ करा. यानंतर बॅग काही वेळ पंख्याखाली किंवा उन्हात ठेवा.
 
3 बेकिंग सोडा - ट्रॉली बॅगवरील घाण आणि हट्टी डाग साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी अर्धा चमचा टूथपेस्ट किंवा नेलपॉलिश रिमूव्हर एक चमचा बेकिंग सोडामध्ये मिसळून ट्रॉली बॅग स्वच्छ करा.
 
4 डिटर्जंट किंवा डिश वॉशर -ट्रॉली बॅगच्या बाहेरील भाग स्वच्छ करण्यासाठी आपण डिश वॉशर किंवा डिटर्जंट वापरू शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे डिटर्जंट पावडर किंवा डिश वॉशर टाका. आता ट्रॉली बॅगमध्ये सुती कापड भिजवून स्वच्छ करा. नंतर थोडा वेळ कोरडे होऊ द्या.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती