kitchen hacks : चाकूची धार खराब झाली असेल तर या सोप्या टिप्स अवलंबवा

शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (09:14 IST)
चाकूची धार कमी किंवा खराब असल्यावर  भाज्या आणि फळे कापण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत करावी लागते. चाकूचा जास्त वापर केल्याने त्याची धार कमी होते. त्यामुळे अनेक वेळा लोक जुना चाकू फेकून देऊन नवीन चाकू घरी आणतात. आपण ही असच  करत असल्यास, पुढच्या वेळी असं करण्यापूर्वी चाकू धारदार करण्याच्या या जपानी पद्धतीचा अवलंब करायला विसरू नका. 
 
वर्तमानपत्राने चाकू कसा धारदार करायचा-
आपण  वर्तमानपत्रात वापरल्या जाणार्‍या काळ्या शाईच्या मदतीने चाकूची धार देखील धारदार करू शकता. हे करताना वृत्तपत्र जास्त जुने नसावे हे लक्षात ठेवा. वर्तमानपत्रात असलेल्या शाईचा चाकूवर तीव्र परिणाम होतो.
 
चाकूची धार कशी तीक्ष्ण करावी
 
*  चाकू कागदावर ठेवा - 
जर आपल्याकडे एकतर्फी ब्लेड असलेला चाकू असेल तर फक्त ती बाजू धार करावी लागेल. हे करत असताना, वर्तमानपत्रावर चाकू सपाट ठेवा. परंतु जर दुहेरी बाजू असलेला चाकू असेल तर दोन्ही बाजूंनी सारखेच करावे लागेल. हे करताना कागदावर कोणतेही दाब येणार नाही हे लक्षात ठेवा अन्यथा वर्तमानपत्र फाटू शकतो आणि आपल्याला दुखापतही होऊ शकते. 
 
* चाकूवर कागद हलक्या हाताने घासून घ्या -
 दगड किंवा स्टीलवर जसे चाकू घासता  तसंच वर्तमानपत्रावरही करावं लागणार. पण लक्षात ठेवा की ते हळूवार आणि आरामात करायचे आहे. कागदावर घासताना चाकू सपाट ठेवा. चाकूला सुमारे 7-10 मिनिटे घासायचे आहे.
 
* स्वच्छ करा, धुवा आणि वापरा -
चाकू वृत्तपत्रावर घासल्यानंतर स्वच्छ करा, कारण ग्रेफाइट चाकूला चिकटू शकतो . यानंतर, प्रथम वर्तमानपत्र कापून ते पहा. चाकूची धार तीक्ष्ण झाली आहे असे वाटत असेल तर एकदा गरम पाण्यात धुवा आणि नंतर भाज्या किंवा फळे कापण्यासाठी वापरा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती