नाती सुधारण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

शनिवार, 30 जानेवारी 2021 (18:20 IST)
नाती बनवणे खूप सोपं आहे पण त्याची जोपासना करणे आणि टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. जीवनात आनंद केवळ चांगल्या नात्यातून येतो. 
असं म्हणतात की नाती हे वरून बांधून येतात. आपल्या नात्यात व्यवहार, समज,आणि एकमेकांवरचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. अशा माणसाला शोधणं ज्याच्या सह आपले संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे खूप अवघड आहे. 
 
प्रत्येक नात्यात चढ- उतार येत असत पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्या नात्याला तिथेच संपवाल. त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. जेणे करून नातं टिकेल.या नात्याला टिकवून ठेवण्यासाठी काही असे टिप्स सांगत आहोत ज्यामुळे नात्यात सुधार होईल.
 
1 एकमेकांसह जास्त वेळ घालवा- 
  आपल्या जोडीदारासह जास्त वेळ घालवा. असं केल्यानं आपल्या मधील विवाद दूर होतील आणि आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू शकाल.एकमेकांना जास्त वेळ दिल्यानं आपण आपल्या जोडीदाराची चांगल्या  प्रकारे काळजी घेऊ शकता. या मुळे आपल्या नात्यात आणखीन मजबुती येते. कार्ड्स खेळा, बाहेर फिरायला जा, नवीन नवीन वस्तूंना वापरा, एकमेकांची मदत करा. काही असं करा की ज्याने दोघांना आनंद मिळेल. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्यामुळे आपल्यामध्ये तणाव येत.
 
2 एकमेकांना मोकळीक द्या-
कधी कधी अशी काही परिस्थिती येते की ज्यामुळे आपण स्वतःलाच समजू शकता. त्या वेळी एकटे राहण्याची इच्छा होते.अशा वेळी आपण जोडीदाराला वेळ द्या.  त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या.
एकमेकांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नका. असं केल्याने नात्यात ओझं वाटू लागते. आपला जोडीदार त्यांच्या मित्रांसह हँगआउट करू इच्छित असतील तर त्यांना अडवू नका. मित्रांसह वेळ घालवणे सर्वांनाच आवडते. आपल्या जोडीदाराचे आपल्यावर जरी प्रेम आहे तरी ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या आयुष्यात मित्रांना जागा नाही. त्यांना देखील त्यांचे आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणून नात्यात जागा देणं किंवा मोकळीक देणं महत्त्वाचे आहे. 
 
3 विश्वास ठेवा -
  कोणत्याही नात्यात विश्वास असणं महत्त्वाचे आहे. कोणत्याही नात्यात जेवढे प्रेम हवे आहे तेवढेच विश्वास असणे महत्त्वाचे आहे.आपल्या नात्यात आलेला संशय नावाचे कीटक आपले संपूर्ण नातं गिळून टाकतो. जर आपण दूर राहत असाल तर असं होण्याची जास्त शक्यता आहे.
एकमेकांवर विश्वास असणं महत्त्वाचे आहे.नाही तर आपले नाते कठीण परिस्थितीत येऊ शकतात. प्रेम कमी असेल तरी नातं टिकवता येत पण जर आपण आपले नाते अधिक दृढ करू इच्छिता तर नात्यात विश्वास असावे. आणि नात्यात थोडी शिथिलता द्यावी.
 
4 आसक्ती असावी -
आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करता त्याला कसं समजणार त्यांना हे दर्शविणे आणि सांगणे देखील महत्त्वाचे आहे.
असं म्हणतात की प्रेमाची कोणतीही भाषा नाही.परंतु हे शब्दात सांगणे देखील आवश्यक आहे. म्हणून एकमेकांवर आसक्ती असावी. हे लक्षात ठेवा की आपण घरातच आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करावे. जगाला हे दाखविण्याची काहीच गरज  नाही की आपले आपल्या जोडीदारावर किती प्रेम आहे.     
 
5 एकमेकांचे ऐकावे -
कोणत्याही गोष्टीवर वितंडवात करण्यापेक्षा एकमेकांची गोष्ट काळजीपूर्वक ऐकून घ्या. वाद घालून कोणत्याही समस्येचे निराकरण  होत नाही असं केल्याने वाद अधिक वाढतात. म्हणून एकमेकांचा पक्ष ठेवून गोष्ट समजून घ्या. जर आपण बरोबर असाल तर आपला जोडीदार आपले म्हणणे ऐकून घेईल. असं केल्यानं आपल्यामधील समजूतदारपणा चांगला होईल. त्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या.     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती